भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर
मुंबई – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सुधा भारद्वाज यांनी कोर्टाकडे डिफॅाल्ट बेलसाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निर्णय दिलाय. हायकोर्टाने सुधा भारद्वाज यांना 8 डिसेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिलेत.
सुधा भारद्वाज यांना विशेष NIA कोर्टासमोर हजर केलं जाईल
आरोपांचे वकील मिहिर देसाई म्हणाले, “सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर झालाय. पण इतर आरोपांना जामीन देण्यात आलेला नाही”.हायकोर्टच्या आदेशानंतर आता सुधा भारद्वाज यांना विशेष NIA कोर्टासमोर हजर केलं जाईल. विशेष कोर्ट जामीनाच्या अटी काय असतील याबाबत सुनावणी करून निर्णय घेईल, असंही हायकोर्टानं म्हटलंय.
कोण आहेत सुधा भारद्वाज?
सुधा भारद्वाज या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेत झाला असून 11 वर्षांच्या असतानाच त्या भारतात आल्या. त्यांनी IITमधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशात परतून पुढचं शिक्षण घेण्याची संधी होतीच, पण कॉलेजच्या काळात त्या दुर्गम भागांतील अनेक सुंदर ठिकाणी फिरल्या होत्या.





