मनोरंजन

ॲडव्हान्स बुकिंगद्वारे ‘पुष्पा 2’ने 24 तासांत कमावले इतके कोटी; विकली लाखो तिकिटं

Pushpa 2  : ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून त्यातही नवा विक्रम रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीजनंतर तुफान कमाई करेल, अशी अपेक्षा असतानाच आता ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त गल्ला जमवल्याचं कळतंय. खरंतर एखाद्या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग दोन किंवा तीन दिवसांपूर्वी सुरू होते. मात्र ‘पुष्पा 2’बद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पाहून सहा दिवस आधीपासूनच म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाली आहे.

ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन 24 तास उलटण्याआधीच या चित्रपटाची लाखो तिकिटं विकली गेली आहेत. या विक्रीतून आतापर्यंत 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. ‘सॅल्कनिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ने ॲडव्हान्स बुकिंगच्या 24 तासांत 2 लाख 48 हजार 384 तिकिटं विकली गेली आहेत. यासोबतच चित्रपटाने आतापर्यंत 7.49 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ब्लॉक सीट्स मिळून कमाईचा हा आकडा 12.84 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा हा आकडा पाहून चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट मूळ तेलुगू आणि तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button