Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘मुघल साम्राज्य इतके वाईट होते, तर ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार पाडा’; नसीरूद्दीन शाह

मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह आपल्या अभिनयाप्रमाणेच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मुघलांविषयी वक्तव्य केलं आहे. झी ५ वरील त्यांची ताज-डिवायडेड बाय ब्लड ही वेबसीरीज सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी राजा अकबरची भूमिका साकारली आहे.

मुघलांचा अपमान करू नये. मुघल इथे लुटायला आले नव्हते. या देशाला ते आपले घर बनवण्यासाठी आले. मुघलांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल साम्राज्य इतके वाईट होते, त्यांनी जे काही केले ते वाईट असेल तर त्यांनी बांधलेला ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार पाडा, असं ज्येष्ठ अभिनेता नसीरूद्दीन शाह म्हणाले.

मुघल हेच सर्व वाईट गोष्टींचं मूर्त स्वरूप होते, असा विचार करणं म्हणजे एखाद्याला देशाच्या इतिहासाची नीट समज नाही असं दिसतं. कदाचित इतिहासाची पुस्तकं भारताच्या स्वदेशी संस्कृतीच्या किंमतीवर मुघलांचा गौरव करण्यापर्यंत खूप दयाळू असतील. परंतु इतिहासातील त्यांचा काळ आपत्तीजनक आहे म्हणून टाकून देऊ नये, असं नसीरूद्दीन शाह म्हणाले.

अर्थातच ते एकटेच नाहीत. दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतांश मुघल आणि इंग्रजांवर आधारित होता. आपल्याला लॉर्ड हार्डी, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि मुघल सम्राट यांच्याविषयी माहिती होती, मात्र आपला गुप्त वंश, मौर्य वंश, विजयनगर साम्राज्य, अजंताच्या गुहांचा इतिहास किंवा पूर्वात्तराविषयी माहिती नव्हती. आपण यापैकी कोणतीच गोष्ट वाचली नाही कारण इतिहास इंग्रज किंवा अँग्लोफाइल्सद्वारा लिहिली गेली होती आणि मला वाटतं ती हे वास्तवात खूप चुकीचं आहे, असंही नसीरूद्दीन शाह म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button