Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘डोअर स्टेप’

पिंपरी : शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून डोअर स्टेप संस्थेची मदत घेतली जात आहे. या संस्थेच्या सहकार्याने या मुलांचा शोध घेऊन त्यांना महापालिका शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. अशी 246 मुले दाखल केली आहेत.

विविध कामानिमित्त स्थलांतरित होणारे बांधकाम मजूर, रस्ते व अन्य कामे करणारे मजूर, वीटभट्टी कामगार आदींचा बर्याचदा ठावठिकाणा नसतो. त्यांना त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. या मुलांना शोधून त्यांना महापालिका शाळेत दाखल केले जाते. जेणेकरून ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. त्यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून डोअरस्टेप या संस्थेची मदत घेतली जात आहे

हेही वाचा    –    HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, ८ महिन्याच्या बाळाला लागण 

विविध कागदपत्रे नसल्यामुळे ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत, याची महापालिका शिक्षण विभागाने काळजी घेतली आहे. या मुलांना ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर ज्या मुलांकडे आधारकार्ड नाही, जन्मदाखल्याचा पुरावा नाही, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

पालिका शिक्षण विभागामार्फत डोअर स्टेपच्याच्या मदतीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये आढळलेल्या 246 मुलांना पालिका शाळांमध्ये दाखल करून घेतले. त्यांच्या शाळा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम त्यानंतर सुरू करण्यात आले. कागदपत्रे नाहीत म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.

– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button