ताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री हिना खानचे बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न

लग्नानंतर हिना खानने स्वीकारला सनातन धर्म

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी नुकतंच लग्न केलंय. या दोघांचा हा आंतरधर्मीय विवाह आहे. कारण हिना मुस्लीम आहे तर रॉकी हिंदू आहे. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर हिनाने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. त्यावर नेटकऱ्यांनी आणि विविध सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता एका अभिनेत्याने हिना आणि रॉकीचा फोटो शेअर करत तिने लग्नानंतर सनातन धर्म स्वीकारल्याचं म्हटलंय.

अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरकेनं हिनाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये हिना आणि रॉकी यांच्या कपाळावर टिळा पहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत केआरकेनं लिहिलं, ‘हिना खानला सनातन धर्म स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा.’ त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून हिनाने लग्नानंतर खरंच धर्मांतर केलं का, असा सवाल अनेकजण विचारत आहेत. केआरकेनं नेमक्या कोणत्या उद्धेशाने ही पोस्ट लिहिली, हे अस्पष्टच आहे. तरी याआधीही हिनाला मंदिरात जाताना आणि देवाचं दर्शन घेताना पाहिलं गेलंय. लग्नापूर्वीच हिना आणि रॉकी बंगळुरूमध्ये अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात गेले होते.

हेही वाचा –  राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

हिना खानला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी झाली. किमोथेरपीदरम्यान हिनाच्या प्रकृतीवर बराच परिणाम झाला होता. तिने तिचे केससुद्धा कापले होते. आता हळूहळू या सर्व गोष्टींमधून ती सावरत असून त्यात रॉकीची तिला खंबीर साथ मिळत आहे. कॅन्सरशी लढा देण्याच्या या संपूर्ण प्रवासात रॉकी तिच्या बाजूने कायम उभा होता. हिना आणि रॉकी यांची भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी निर्माता होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button