‘प्रभाग क्रमांक १० मध्ये शासकीय माध्यमिक व इंग्रजी शाळा उभारणार’; अनुराधाताई गोरखे
संकल्प: परवडणाऱ्या व दर्जेदार शिक्षणासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १० मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार, परवडणारे व समान शिक्षण मिळावे, यासाठी शासकीय माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक १० मध्ये आर्थिक मागासवर्गीय, मध्यमवर्गीय तसेच कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. मात्र, अनेक भागांत शासकीय शाळांचा अभाव असल्याने पालकांना खासगी शाळांचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. काही कुटुंबांसाठी तर प्राथमिक शिक्षणाचाही खर्च जड जात असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
हेही वाचा – शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग, ठाकरे गटासह काँग्रेसमध्ये खळबळ, मोठा पक्षप्रवेश
नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागण्या आणि विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक कुचंबणा लक्षात घेता, महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १० मध्ये शासकीय माध्यमिक व इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे अनुराधाताई गोरखे यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित शाळा ‘रोल मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, वंचित, दुर्बल व गरीब घटकांतील विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. प्रभागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“एक आदर्श समाज घडवण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
– अनुराधाताई गोरखे, मा. नगरसेविका.





