Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘बॉलिवूडमध्ये पहिले गरोदर होतात मग लग्न करतात’; केआरकेचा कियारा-सिद्धार्थला अप्रत्यक्ष टोला

बॉलिवूडमध्ये पहिले गरोदर मग लग्न करण्याचा ट्रेंड सुरू
Kamal Khan krk : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. कियारा आणि सिद्धार्थ हे नुकतेच मुंबईत परतले तेव्हा विमानतशावर कियाराने परिधान केलेल्या कपड्यावरून लोकांनी ती गरोदर असल्याचा अंदाज लावला. यावरून आता प्रसिद्ध अभिनेता निर्माता केआरकेनं ट्विट केलं आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्याविषयी केआरकेनं नुकतंच ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, बॉलिवूडमध्ये सध्या एक ट्रेंड सुरू आहे तो म्हणजे पहिले गरोदर होतात मग लग्न करतात. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये जे नुकतेच लग्न झाले आहे ते देखील याच पद्धतीने झाले आहे, अशी प्रतिक्रिया कमाल आर खान म्हणजेच केआरके याने दिली आहे.

दरम्यान, केआरकेने अभिनेत्री रवीना टडनवरदेखील टीका केली आहे. रवीनाला जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्काराबाबत त्याने ट्विट केलं आहे. रविना टंडन हिला यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार मिळणार आहे. जिने टिप टिप बरसा पानी सारखं गाणं केलं आहे. पद्मभूषण पुरस्कार म्हणजे गंमत आहे का?, अशी टीका केआरकेने केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button