डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना ‘‘ऑन द जॉब ट्रेनिंग’’
30 हून अधिक कंपन्यांचा सहभाग : १६०० हून अधिक इच्छुक उमेदवारांची नोंदणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन अँड मॅनेजमेंटतर्फे कार्यानुभव व ऑन द जॉब ट्रेनिंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कंम्पुटर एप्लीकेशन्स अँड मॅनेजमेंट आकुर्डी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्रज्ञान भागीदार टॅलेंलिओ (Talenlio) यांच्या सहकार्याने एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी “कार्यानुभव व ऑन द जॉब ट्रेनिंग” (Job Fair 2025) मेळाव्याचे आयोजन आकुर्डी कॅम्पस मध्ये केले होते.
हेही वाचा : महिला बचत गटाच्या माध्यमातून चालणार शून्य कचरा प्रकल्प
या कार्यक्रमात एकूण ३० हून अधिक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते. १६०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली. ही संधी विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीची दिशा ठरवण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरली.
डॉ. के. निर्मला – संचालक, प्रा. जस्मिता कौर – डीन (प्लेसमेंट), तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी व DYPIMCAM च्या संपूर्ण कार्यसमितीने Job Fair 2025 यशस्वीरीत्या यजमान म्हणून पार पाडले.