इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ आरोपावर गौतम पाटीलचे स्पष्टीकरण
इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही
![Gautami Patil said that my remuneration is not as much as Indurikar Maharaj says](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/indurikar-maharaj-and-gautami-patil-780x470.jpg)
Gautami Patil : नृत्यागणा गौतमी पाटील आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोण किती पैसे घेतं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गौतमीनं यावरून वक्तव्य केलं आहे.
गौतमी पाटील म्हणाली की, ते महाराज आहेत त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. तसेच इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रूपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केलं नसते. मली तीन गाण्यासाठी कोणीही तीन लाख रूपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाले.
तसेच आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जाणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने सांगीतले.
दरम्यान, गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. तिच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होते. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.