Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवैधरित्या ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून केला जप्त

पिंपरी |महाईन्यूज|

गोदामात अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 16 लाख 75 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 18 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. 23) ही कारवाई केली.

कार्तिक सुभाष दळवी (वय 22, सध्या रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी. मूळ रा. मोताळा, बुलढाणा), किरण कोठारी (रा. घरकुल, चिखली), गोपाल पाटील (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी आरोपी दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी स्वप्नील लांडगे यांना माहिती मिळाली की, आरोपींनी बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथील एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून आरोपी दळवी यास अटक केली.

तसेच, गोडावूनमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि टेम्पो असा 18 लाख 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दळवी याचे दोन साथीदार कोठारी आणि पाटील फरार झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button