बॉलिवूड चित्रपट भारतातील बॉक्सऑफिसवर चालला नाही, पाकिस्तानात धुमाकूळ
पाकिस्तानी लोकंही करतायत या अभिनेत्याचं कौतुक

मुंबई : बॉलिवूडमधील असे अनेक चित्रपट आहेत जे भारतात नाही पण पाकिस्तानात धुमाकूळ घालतात. पाकिस्तानात अनेक बॉलिवूड चित्रपट रिलीज होत असतात. असाच एक बॉलिवूड चित्रपट जो भारतातील बॉक्सऑफिवर चालला नाही पण पाकिस्तानात धुमाकूळ घालतोय.हा चित्रपट म्हणजे शाहिद कपूरचा ‘देवा’.
पाकिस्तानात धुमाकूळ घालतोय हा चित्रपट
हा चित्रपट पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जो एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे. शाहिदचा ‘देवा’ चित्रपट भारतात काही खास कामगिरी करू शकला नाही, पण पाकिस्तानमध्ये तो नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर आहे.हा चित्रपट 2o13 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट ‘मुंबई पोलिस’ चा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी देखील आहेत.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य
शाहिद कपूरचा अॅक्शन थ्रिलर ‘देवा’
शाहिद कपूरचा अॅक्शन थ्रिलर ‘देवा’ चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात बऱ्याच दिवसांनंतर शाहिदचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता, पण, शाहिदच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. माहितीनुसार, 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जगभरात 51.73 कोटींची कमाई केली आहे. तर देशात फक्त 37.86 कोटींचा गल्ला जमवला. पण हा चित्रपट पाकिस्तानात मात्र धुमाकूळ घालतोय. देवा पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील प्रेक्षकांना शाहिदचा अभिनयही पसंतीस उतरला असून त्यांनी शाहिदचे खूप कौतुकही केलं आहे.
शाहिदच्या देवाप्रमाणे अजय देवगनचा ‘आझाद’ चित्रपट पाकिस्तानात प्रेक्षकांच्या पसंतीस
दरम्यान ‘देवा’ चित्रपट आज मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात शाहिदने पोलीस अधिकारी देव अंब्रेची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री पूजा हेगडे आहे. शाहिदच्या देवाप्रमाणे अजय देवगनचा ‘आझाद’ चित्रपट पाकिस्तानात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच मल्याळम चित्रपट ‘ऑफिसर ऑन ड्यूटी’ हा चित्रपट देखील पाकिस्तानात ट्रेंडिंगमध्ये आहे. हा एक क्राइम अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन जीतू अशरफ यांनी केले आहे.