अर्वान’ लघुपटाला दिग्दर्शनासाठी ‘बेस्ट ऑफ पुणे’ पुरस्कार
१५व्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ‘अर्वान’ लघुपटाने बाजी मारली

पुणे : पुण्यात पार पडलेल्या १५व्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ‘अर्वान’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाच्या दिग्दर्शक हर्षल आल्पे यांना ‘बेस्ट ऑफ पुणे (दिग्दर्शक)’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘अर्वान’चे लेखन आणि दिग्दर्शन हर्षल आल्पे यांनी केले आहे. निर्मिती स्मिता आल्पे यांची असून कार्यकारी निर्माते म्हणून श्रीपाद दीक्षित यांचे योगदान लाभले आहे.
संकलन वज्रांग आफळे यांनी केले असून, आदित्य देशपांडे, ऋचा पोंक्षे, योगंधरा बढे, मीनल रणदिवे आणि अभिषेक विरकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा – ते तर 25 जागा जिंकू शकत नव्हते…त्यांनी राज्याच्या निवडणूक हायजॅक केली, राहुल गांधीनंतर राऊत सुद्धा आक्रमक
हा पुरस्कार ज्येष्ठ निर्माते नितीन लचके आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हर्षल आल्पे यांना प्रदान करण्यात आला. नळ स्टॉप येथील लोकायत सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारितोषिक स्वीकारल्यानंतर हर्षल आल्पे यांनी, “संपूर्ण टीमचे, पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे, मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच योगेश बारसेकर यांचे आभार मानतो. प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीच्या कथा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील,” असे सांगितले.