Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यानात सामुदायिक कंपोस्टिंग केंद्राचे उद्घाटन

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यान, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे एस.ओ.आर.टी. (S.O.R.T.) सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र (CCCM) मॉडेलचे उद्घाटन सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रदीप टेंगल यांच्या हस्ते झाले.

हे सामुदायिक कंपोस्टिंग केंद्र दररोज सुमारे २५० किलो सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून, एरोबिक कंपोस्टिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोषक तत्त्वांनी समृद्ध कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरणपूरक कचरा प्रक्रिया प्रणालीला चालना मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना सहाय्यक आयुक्त प्रदीप टेंगल यांनी स्वर्ण लता मदरसन ट्रस्ट आणि इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशन यांच्या एस.ओ.आर.टी. उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी CCCM सारखी विकेंद्रित मॉडेल्स प्रभावी ठरतात, असे नमूद करत त्यांनी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध भागधारकांमधील समन्वय व सहकार्यामुळे समाजात सकारात्मक आणि परिवर्तनकारी बदल घडून येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा    :          पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ पद्धतीने करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

तसेच, क्षेत्रीय अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण सोसायट्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एस.ओ.आर.टी. उपक्रमाचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. आगामी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या आढावा बैठकीत CCCM मॉडेलचा समावेश करण्यात येईल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या मॉडेलची अंमलबजावणी वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या उद्घाटन समारंभाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रदीप टेंगल, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. तानाजी दाते, प्रशासन अधिकारी सौ. वाईकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. सुधीर वाघमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी (एफ झोन) श्री. महेश आढाव, सहाय्यक आरोग्य अधिकारी (ई-झोन) श्री. राजेश भाट, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. अंकुश झिटे तसेच प्रकल्प व्यवस्थापक झीशान खान आणि कार्यक्रम व्यवस्थापक वैभव नसुर्डे, सुचित चौधरी, दत्ता हेंद्रे व गुलाब साबळे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button