ऐश्वर्या रायचा चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन 2’ ला बेस्ट एक्ट्रेसचा (तामिळ) पुरस्कार
ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार
अबू धाबी : बॉलीवूडमधील चर्चेतील अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय बच्चन सध्या अबू धाबीमध्ये आहे. 24वें आयफा अवार्ड्स 2024 मध्ये ती मुलगी आराध्यसह सहभागी झाली आहे. आयफा अवार्ड्स 2024 मध्ये पहिल्या दिवशी साउथ सिनेमाचा उत्सव झाला. त्यामध्ये साउथ स्टार्स आणि त्यांच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. ऐश्वर्या राय हिचा चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन 2’ ला बेस्ट एक्ट्रेसचा (तामिळ) पुरस्कार मिळाला. आयफाच्या स्टेजवर ऐश्वर्याने ‘पोन्नियिन सेलवन 2’ चे डायरेक्टर आणि तिचे गुरु मणिरत्नम यांचे पाय धरले. वाकून त्यांना नमस्कार करत आशीर्वाद घेते. आयफाच्या व्यासपीठावरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बच्चन कुटुंबातील सुनेचे संस्कार पाहून युजर इमोशनल झाले आहे.
काय आहे त्या व्हिडिओमध्ये
व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय गोल्डन वर्क घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेण्यासाठी रंगमंचावर जाते. त्यानंतर तिच्या सुपरहिट झालेल्या चित्रपट ‘ताल’चे दिग्दर्शक मणिरत्नम यांचे पाय धरते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. मणिरत्नम निळ्या कोट आणि पँटमध्ये ऐश्वर्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओकडे लोकांचे झपाट्याने लक्ष वेधले जात आहे आणि ते त्यावर कमेंट करत आहेत.
काय म्हटले चाहत्यांनी
ऐश्वर्या आणि मणिरत्नम यांच्या या हिट जोडीचा व्हिडिओ पाहून चाहते इमोशनल झाले आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘ऐश आणि मणिरत्नमची जोडी अप्रतिम आहे’. दुसरा यूजर लिहितो, ‘ऐश्वर्या आणि मणी’. एका यूजरने लिहिले आहे, ‘व्वा, काय संस्कृती आहे.’ अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.
ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार
ऐश्वर्या रायला पोनियिन सेल्वन 2 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला आहे. पोनियिन सेल्वन 2 हा चित्रपट गेल्या वर्षी 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 345 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपटात चियान विक्रम, जयम रवी, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याची दुसरी पत्नी शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत आहेत.