Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

सलमान खाननंतर आता आमिर खान बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर! तिसऱ्या लग्नावरून जीवे मारण्याची धमकी

Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सातत्याने धमक्या देणाऱ्या बिश्नोई टोळीने आता आपला मोर्चा अभिनेता आमिर खानकडे वळवला आहे. सोशल मीडियावर कथित पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी आमिर खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमिर खानने काही दिवसांपूर्वीच गौरी स्प्रॅटसोबत केलेल्या तिसऱ्या विवाहावरून हा वाद निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर बिश्नोई टोळीचे कथित सदस्य आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आमिर खान ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमिर खानसारखे लोक आपल्या संस्कृतीविरोधात लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही अशी कृत्ये सहन करणार नाही, लवकरच याचे प्रत्युत्तर दिले जाईल. हे कृत्य आमच्या सनातन धर्माच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना वचन देतो की, या घाणेरड्या कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू. स्टारडमच्या नावावर जे लोक अशी कृत्ये करत आहेत, त्यांचा श्वास कायमचा बंद केला जाईल.”

हेही वाचा

भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! स्कायरूटच्या पहिल्या ‘विक्रम-१’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल

या सोशल मीडिया पोस्टसोबतच एक कथित ऑडिओ क्लिपही इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिश्नोई टोळीचे कथित सदस्य आमिर खानला थेट इशारा देताना ऐकू येत आहेत. आमिर खान आणि बॉलिवूडमधील काही लोकांची कृत्ये भारतीय संस्कृतीच्या विरोधात असून ती खपवून घेतली जाणार नाहीत, असे या क्लिपमध्ये म्हटले गेले आहे. दरम्यान, या सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही.

६१ व्या वर्षी आमिर खानचा तिसरा विवाह

अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी ५ जुलै रोजी एका अत्यंत खाजगी समारंभात नोंदणी पद्धतीने (रजिस्टर मॅरेज) लग्न केले. या विवाह सोहळ्याला केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रमंडळी उपस्थित होती. ६१ वर्षीय आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचे रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह झाले होते, ज्यांच्याशी नंतर त्याचा घटस्फोट झाला. या तिसऱ्या लग्नानंतरच आता बिश्नोई टोळीच्या नावाने या धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button