Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘राजकीय अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न…’, CJP वर श्वेता तिवारीचा संताप, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर मोठं वक्तव्य

Sonam Wangchuk : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 21 दिवस असून त्यांना उपोषण स्थळावरून पोलिसांनी हटवण्यात आलं आहे. ज्यामुळे वातावरण अधिक तापलं आहे. यावर सर्वच स्तरावरील व्यक्ती पुढे येत सोनम वांगचुक यांचं समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीला देखील अनेक कलाकारांकडून समर्थन मिळत आहे. पण अभिनेत्री श्वेता तिवारी हिने कॉकरोच जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. ‘स्वतःचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी सोनम वांगचुक यांचा वापर करु नका.’ असं श्वेता तिवारी एक पोस्ट करत म्हणाली आहे.

श्वेता तिवारी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘सोनम वांगचुक एका चांगल्या उद्देशाने लढत आहेत. शिक्षण आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वांगचुक लढत आहे. त्यांचा उद्देश लक्षणीय आहे आणि सरकारने त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या पाहिजेत.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला हे देखील स्पष्ट करायचं आहे की, मी ‘कॉकरोच जनता पार्टी’सोबत नाही आणि मी त्यांना पाठिंबा देखील देत ​​नाही. ते ज्या पद्धतीने हा मुद्दा हाताळत आहेत, ते मला मान्य नाही. मला वाटते की ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा वापर स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी करत आहेत. मी या दृष्टिकोनाला पाठिंबा देत नाही.’

हेही वाचा –  चिंचवडच्या ‘समरसता गुरुकुलम’ला महापालिकेचे पालकत्व द्या; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

‘माझं समर्थन फक्त आणि फक्त सोनम वांगचुक यांना आहे आणि त्याच्या उत्तम उद्देशांना आहे, ज्यासाठी ते लढत आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाला माझं समर्थन नाही. जे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा फायदा त्यांच्या स्वर्थासाठी घेत आहेत.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे.

नुकताच, जेव्हा सोनम वांगचुक आणि त्यांच्या उपोषणाबाबत विवेक ओबेरॉय याला विचारण्यात आलं, तेव्हा त्या विषयावर मत मांडण्याऐवजी विवेक असं म्हणाला की, “मी अभिनेता आहे, राजकारणी नाही; मी राजकीय मुद्द्यांकडे फारसं लक्ष देत नाही.” अभिनेत्याच्या या विधानावर विविध स्तरांतून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनासाठी पुढाकार घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button