Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात एक वर्षाचा कारावास

Actress Ranya Rao | कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात बंगळुरुच्या न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विदेशी मुद्रा संरक्षण आणि तस्करी निवारण अधिनियम (COFEPOSA) सलाहकार बोर्डाने हा आदेश जारी केला असून, रान्यासह दोन अन्य आरोपींनाही जामीन मिळण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे.

रान्या रावला यावर्षी 3 मार्च 2025 रोजी बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14.8 किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. हे सोनं ती दुबईहून अवैधरित्या भारतात आणत होती, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 12.56 कोटी रुपये आहे. राजस्व गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली होती. रान्याने 15 दिवसांत चार वेळा दुबईचा प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता.

हेही वाचा     :        नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ साठी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय! 

तपासादरम्यान, रान्या रावने हवाला मार्गाने पैसे हस्तांतरित करून सोनं खरेदी केल्याची कबुली दिली होती, असे राजस्व खुफिया निदेशालयाने नमूद केले आहे. तसेच, प्रवर्तन संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग तपासांतर्गत रान्याच्या 34 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे.

रान्या राव ही कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. या प्रकरणामुळे त्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. रान्या रावने 2014 मध्ये ‘माणिक्य’ या कन्नड चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि तमिळ चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान रान्याने पश्चाताप व्यक्त केला आणि मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले. मात्र, पुरावे आणि साक्षींशी छेडछाड होण्याची शक्यता लक्षात घेता, न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button