मनोज बाजपेयी वर दु: खाचा डोंगर वडिलांनंतर आईचीही छत्रछाया गेली
![A mountain of grief on Manoj Bapay, then the umbrella of his mother](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/543765-manoj-bajpayee-s-mother-geeta-devi-passes-away-in-delhi-780x470.webp)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या डोक्यावर दुख: चा डोंगर कोसळला आहे. मनोजची आई गीता देवी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. गीता देवी या गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजारानं त्रस्त होत्या. दिल्लीतील रुग्णालयात गुरुवारी सकाळी 8.30 वाजता दीर्घ आजारानं त्यांचे निधन झाले.
दीर्घ आजारानं झालं निधन
रिपोर्ट्सनुसार, मनोज यांची आई गीता देवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या एका आठवड्यापासून गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother .
— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022
ओम शांति !
🙏
मनोज वाजपेयीच्या आईच्या निधनाची माहिती ही अशोक पंडित यांनी ट्वीट करत दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ‘मनोज बजायेपी तुमच्या आदरणीय आईच्या निधनासाठी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती’ (Manoj Bajpayee s mother Geeta Devi passes away in Delhi)
मनोज बाजपेयी त्याच्या आईच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत होते. मनोज बाजपेयीसाठी त्याच्या आईचे निधन हा मोठा धक्का होता, कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी वडिलांना गमावले होते. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी मनोज बाजपेयी यांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचबरोबर या वाईट काळात अभिनेत्याला बळ मिळो, अशी प्रार्थनाही ते करत आहेत. सध्या मनोज बाजपेयी आणि त्यांच्या आईचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.