Breaking-newsमनोरंजन

22 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

प्रख्यात कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबियाना मायकेल यांचे मंगळवारी संध्याकाळी एका अपघातात निधन झाले. अभिनेत्री मेबियाना फक्त 22 वर्षांची होती. मेबियाना मायकेलच्या या अपघाती निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली

आहे.

मंगळवारी संध्याकाळी मेबियाना मायकेलची कार ट्रॅक्टरला ठोकल्य़ामुळे हा अपघात झाला. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या गावी जात होती, पण रस्त्यातच तिच्या कारला अपघात झाला. मेबियाना सोबत असलेले तिच्या काही मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण मेबियानाचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे. इतक्या लहान वयात तिचं जाणं अनेकांना चटका लावणारं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button