बॉक्स ऑफिसवर ‘वेड’ सिनेमाचा धुमाकुळ; आठवड्यात २० कोटींची कमाई

मुंबई : रितेश देशमुख व जिनिलीया ही लाडकी जोडी वेड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रितेश देशमुखने स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.
पहिल्या दिवसापासूनच ‘वेड’नं बॉक्स ऑफिसवर पकड निर्माण केली होती. पहिल्या दिवशी म्हजेच गेल्या शुक्रवारी चित्रपटानं २.२५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी या आकडा वाढला, चित्रपटाची ३.२५ कोटींची कमाई झाली होती. तिसऱ्या दिवशी ४.५० कोटी, चौथ्या दिवशी ३.०२ कोटी तर पाचव्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे २.६५ कोटींचा गल्ला जमल्याचं समोर आलं. सहाव्या दिवशी चित्रपटानं २.४५ कोटींची कमाई केली.तर एका आठवड्याच चित्रपटानं एकूण २०.६७ कोटीं कमावले आहेत.
वेड हा सिनेमा 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्यभरातील 250 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला. त्याला 1000 शो मिळाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होताच राज्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. सहाव्या दिवशीही हा सिनेमा गर्दी खेचतोय.
वेड या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.





