संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
![Musician Narendra Bhide dies of heart attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/narendra-bhide.jpg)
पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका आणि मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान, भिडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
नरेंद्र भिडे यांनी सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, अनुमती, दिल ए नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम 302, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, चाँद फिर निकला (हिंदी) अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच कोण म्हणतं टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्ड्स, व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलिबाबा आणि 40 चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण या नाटकांनादेखील त्यांनी संगीत दिले आहे.