Breaking-newsमनोरंजन

रणबीर-आलिया नोव्हेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ?

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी बऱ्याच चर्चा ऐकू येत आहेत. नवीन वर्षात रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण ही जोडी पुढच्या वर्षी नव्हे तर याच वर्षी लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. नोव्हेंबर महिन्यात हा बहुचर्चित विवाहसोहळा पार पडणार आहे.

विराट-अनुष्का, दीपिका-रणवीर या जोड्यांप्रमाणेच रणबीर-आलियासुद्धा परदेशात विवाहबद्ध होणार आहेत. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांसाठी या जोडीने फ्रान्स हा देश निवडला असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनाच रणबीर-आलियाने पसंती दिली आहे. सब्यसाची यांनी विराट-अनुष्का, रणवीर-दीपिका आणि प्रियांका चोप्रा- निक जोनास यांच्या लग्नासाठीही कपडे डिझाइन केले होते.

विशेष म्हणजे दीपिका-रणवीरसुद्धा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध झाले होते. सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा रणबीर-आलियाने एकत्र हजेरी लावली होती, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरविषयी चर्चा रंगू लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांविषयी प्रेमाची कबुलीसुद्धा दिली होती. हे दोघं लवकरच एकत्र ऑनस्क्रीनसुद्धा झळकणार आहेत. करण जोहरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर-आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button