Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राखीव साठा मिळाला नाही तर मुंबईकरांवर यंदा पाणी कपातीची वेळ ? पाणीसाठा ३२ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. मात्र राज्य सरकारने यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे राखीव साठा न मिळाल्यास मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर म्हणजेच ३२.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. मात्र मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे. मुंबई महापालिका दरवर्षी जुलै अखेरीसपर्यंत पाणीसाठा पुरेल या दृष्टीने पाण्याचे नियोजन करीत असते. मात्र धरणातील पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा –  ‘मातृसेवा संघ महिला व बालकांसाठी आजही निस्पृहपणे सेवाव्रत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरणातील राखीव साठा हवा …. मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र लिहून उर्ध्व वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष घनमीटर तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष घनमीटर (एमसीएम) राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दोन वर्षांच्या तुलनेत जास्त साठा … मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर (३२.०६ टक्के) पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ४ लाख १६ हजार ४४३ दशलक्षलीटर (२८.७७ टक्के) इतका होता. तर त्याच्या आधीच्यावर्षी पाणीसाठा ३ लाख ३२ हजार ७१५ (२२.९९ टक्के) इतका होता.

ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश दरम्यान, यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महापालिकेला राखीव साठा वापरण्यास मंजूरी दिली नाही तर यंदा पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button