‘ये रिश्ता क्या केहलाता है’ सुप्रसिद्ध मालिकेतील तीन कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – लॉकडाऊनच्या सुरुवातीला ठप्प झालेले चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण मागील काही दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या सुप्रसिद्ध मालिकेतील तीन कलाकरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा थांबविण्यात आले आहे. तसेच मालिकेतील इतर कलाकारांनीदेखील स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.
मालिकेत मनिष गोयंकाची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन त्यागीची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आली होती. त्यांनतर समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस या दोन कलाकारांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, सचिन त्यागी, समीर ओनकर आणि स्वाती चिटनिस यांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच मोहसिन खान (कार्तिक), शिवांगी जोशी आणि मालिकेतील इतर कलाकारांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे.





