Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण
‘महाईन्यूज’चे वृत्त तंतोतंत खरे : पिंपरीतील भाजपाचे अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी!
राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागासांठी भाजपाची यादी जाहीर
पिंपरी : राज्यात विधानारिषदेसाठी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या मध्ये पिंपरी-चिंचवडमधून अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे शहरात आता आमदारांची संख्या पाच होणार आहे.
दरम्यान, याबाबत ‘महाईन्यूज’ने ‘‘दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेवर अमित गोरखे यांना संधी’’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.

महायुतीमध्ये भाजपाला पाच जागा सुटल्या होत्या. त्यामध्ये पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गोरखे यांच्यासह पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर हे चार उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





