Breaking-newsमनोरंजन

‘मी शिवाजी पार्क’ची आता परदेशवारी

न्यायव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता तो परदेशवारी करणार आहे. हा चित्रपट लवकरच अमेरिका,जर्मनी या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.

आशयाने परिपूर्ण असलेला ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर काही काळातच त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. त्यानंतर आता येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिच मध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास, बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहात ‘मी शिवाजी पार्क’ प्रदर्शित होणार आहे.

‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’च्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button