breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

इलॉन मस्क ट्वीटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार, महिलेकडे देणार मोठी जबाबदारी

Twitter : उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्वीटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ट्वीटरच्या नवीन सीईओचीही घोषणाही केली. पण नव्या सीईओचे नाव जाहीर केले नाही. तसेच सीईओ एक महिला असून येत्या सहा आठवड्यात ती आपली जबाबदारी स्वीकारणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एनबीसी युनिर्व्हसल कंपनीची प्रमुख लिंडा याकरिनो यांच्याकडे सीईओ पद देण्याची दाट शक्यता आहे. त्यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. एलॉन मस्क लवकरच राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी लिंडा याकरिनो यांची नियुक्ती करण्यात येईल.

हेही वाचा – शिदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! परमबीर सिंग यांचे निलंबन घेतले मागे

दरम्यान, एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ४४ अब्ज डॉलरला ट्विटर विकत घेतले होते. न्यायालयीन कचाट्यातून वाचण्यासाठी इच्छा नसतानाही मस्क यांना ही खरेदी करावी लागली होती. त्याचा सूड ही त्यांनी ट्वीटरवर उगारला. त्यांचे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचे, कार्यालय बंद करण्याचे, फर्नीचर विक्रीचे आणि ब्लू टिकचे निर्णय आतापर्यंत चर्चेचा विषय ठरले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button