breaking-newsTOP NewsUncategorizedटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेश

ईलाॅन मस्कने बदलला नेत्यांचा रंग; टिक झाली निळ्याची ग्रे

नवी दिल्ली ः ट्विटरने आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलवरील टिकचा रंग राखाडी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या ट्विटर हँडलवरील टिकचा रंग राखाडी झाला आहे.

यासह अनेक राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्विटरवरील टिकचा रंग राखाडी झाला. मात्र देशभरातील सर्व राजकीय नेत्यांचा व सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलवरील टिकचा रंग राखाडी झाला नव्हता. अनेक नेत्यांच्या ट्विटर हँडलवरील टिकचा रंग निळाच होता. येत्या काही दिवसांत हा बदल सर्वच राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलवर दिसणार आहे.

ईलाॅन मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर अनेक बदल जाहीर केले. ट्विटरच्या टिकचा रंग बदलण्याचे संकेत मस्क यांनी दिले होते. कंपन्यांसाठी सोनेरी रंग, राजकीय नेते व सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखाडी रंग, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी निळ्या रंगांचे टिक असेल, असे मस्क यांनी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी राखाडी रंगाचा बदल दिसला.

दरम्यान मस्क यांनी सोमवारी ट्विटरच्या प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. याने जगभरात एकच खळबळ उडाली. राजीनामा द्यावा की नाही यासाठी मस्क यांनी युजर्सचा कौल घेतला. मस्क यांनी राजीनामा द्यावा असा कौल ५७.५ टक्के युजर्सने दिला आहे. तर ४२.५ टक्के युजर्सने त्यांनी राजीनामा देऊ नये, असे सांगितले आहे. त्यामुळे मस्क हे राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुमारे १ कोटी ७५ लाख युजर्सनी यासाठी मतदान केले होते.

मस्क यांचे अनेक निर्णय धक्का देणारे ठरले. त्यांचा नोकर कपातीचा निर्णय संंपूर्ण जगाला हादरवणारा होता. तसेच १५० कोटी ट्विटर अकाऊंट बंद होणार आहेत, असेही मस्क यांनी जाहीर केले होते. जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजर्ससाठी जागा बनवण्यात येईल. हे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे, असे मस्क यांनी सांगितले होते. त्यामुळे ट्विटर युजर्सची चिंता वाढली आहे. या लिस्टमध्ये आपले अकाउंट आहे का? या प्रश्नाने युजर्स चितेंत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button