breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

गावकारभारी जोरात ः ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी

मुंबई ः राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाची होती. परंतु निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यातील जनतेने सर्वाधिक पाठिंबा भाजपला दिल्याचं दिसून आलं आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सरशी केली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेनेलाही जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

7751 पैकी 7545 ग्रामपंचायतींचा निकाल समोर
1) भाजप – 2309

2) राष्ट्रवादी काँग्रेस – 1509

3) इतर – 1263

4) काँग्रेस – 961

5) शिंदे गट – 800

6) ठाकरे गट – 703

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे वर्चस्व
ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले आहे.

लातूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप –

बिनविरोध: 16 सर्वपक्षीय: भाजप -153, काँग्रेस -73, राष्ट्रवादी – 42
ठाकरे गट – 16, शिंदे गट – 03, मनसे – 03, इतर – 42, सरपंच पद रिक्त – 03

अहमदनगर : एकूण ग्रामपंचायत – 203

बिनविरोध : 13 भाजप – 74, राष्ट्रवादी – 68, काँग्रेस – 27, ठाकरे गट – 19, शिंदे गट – 1, इतर – 14

पुणे जिल्ह्याचा निकाल – 221

भाजप – 33, राष्ट्रवादी – 105, काँग्रेस – 44, ठाकरे गट – 15, शिंदे गट – 15

वर्धा जिल्ह्याचा निकाल – 113

भाजप – 51, राष्ट्रवादी – 03, काँग्रेस – 40, ठाकरे गट – 01

धुळे जिल्ह्याचा निकाल – 128

भाजप – 52 , राष्ट्रवादी – 03, काँग्रेस – 29 ठाकरे गट – 07, शिंदे गट – 31

जळगाव जिल्ह्याचा निकाल – 140

भाजप – 43 , राष्ट्रवादी – 32, काँग्रेस – 16, ठाकरे गट – 13, शिंदे गट – 27

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल – 222

ठाकरे गट – 101, शिंदे गट – 45, भाजप – 17 , राष्ट्रवादी – 08, काँग्रेस – 03,

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल – 325
भाजप – 182, ठाकरे गट -76, शिंदे गट – 24, राष्ट्रवादी – 01

विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यात 3 हजार 29 ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आमची सरसी झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button