Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

Electricity Bill Hike : महावितरणाकडून नागरिकांना शॉक, महिन्याचे बिल ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

मुंबई : राज्यात एकीकडे राजकारण तर दुसरीकडे पाऊस, करोना आणि नैसर्गित संकट यामुळे सामन्य जनता भरडत चालली आहे. अशात ऐन महागाईत नागरिकांना आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. कारण, महावितरणने इंधन समायोजन शुल्कात (एफएसी) वाढ केल्याने महागाईचा सामना करणाऱ्या वीज ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

महावितरणच्या इंधन दरवाढीमागे एफएसी वाढवण्याला निर्णयाला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) मान्यता दिली आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार, १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट १० पैशांऐवजी ६५ पैसे, ३०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी २० पैशांऐवजी १ रुपये ४५ पैसे, ५०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट २५ पैशांऐवजी २ रुपये. ५ पैशांपेक्षा जास्त आणि ५०० युनिट्सच्या वापरासाठी २५ पैशांऐवजी २ रुपये ३५ पैसे शुल्क आकारलं जाणार आहे.

किती शुल्काने वीजबिल वाढणार?
यामुळे आता जर तुम्हाला ५०० रुपये बिल येत असेल तर ते वाढून तुम्हाला ५८० रुपये बिल येईल. १ हजार रुपये बिल येत असेल तर ते वाढून आता १ हजार २०० होईल आणि जर तुम्हाला १ हजार ५०० बिल येत असेल तर ते वाढून हजार ७०० होईल. म्हणजेच तुमच्या बिलामध्ये १५ ते १६ टक्के वाढ होणार असून ही सामान्यांच्या खिशाला कात्री आहे.

‘महाविकास आघाडी सरकारच्या चुकीचा परिणाम’
महाविकास आघाडीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांना महागडी वीज मिळणार असल्याचा आरोप भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आघाडी सरकारने स्वस्त वीज खरेदी केली नाही. त्या काळात कोळशाचा साठा नव्हता. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात महागड्या दराने वीज खरेदी करण्यात आली. त्यामुळे तो पैसा वसूल करण्यासाठी बिलांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, महावितरणनेही एमईआरसीची मान्यता घेतली असून हे शुल्क फक्त ४ महिन्यांसाठी आकारले जाईल, अशीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

आर्थिक गणित कोलमडणार…
महागाई जास्त असताना ज्या ग्राहकांना मासिक वीज बिलासाठी अधिक पैसे द्यावे लागतात त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. एलपीजीचे दर प्रति सिलिंडर रु. १००० ओलांडले आहेत, पाईप गॅसची किंमत सुमारे ४५ रुपये प्रति युनिट आहे, सीएनजी ७६ रुपये प्रति किलो, पेट्रोल १११.३५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.२५ रुपये आहे. त्यात या वाढीमुळे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button