breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,46,777 वर

  • मुंबईत 987, पुण्यात 1,109 नवे रुग्ण

    मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर, शनिवारीदेखील 8 हजार 623 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 46 हजार 777 वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी ५१ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यावरून कोरोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असून आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय काल दिवसभरात राज्यात ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत २० लाख २० हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासह राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.१४ टक्के एवढे झाले आहे.

    वाचा :-देशभरात गेल्या 24 तासात 16,752 नवे कोरोना रुग्ण, तर 113 मृत्यू

    महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 987 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 801 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,24,864 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3,03,033 जण कोरोनामुक्त झाले असून 11,465 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 9,496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात शनिवारी 1,109 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 13 कोरोनाबाधितांची मृत्यू झाला. तसेच 743 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4,06,057 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9,234 इतका झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल आढळलेल्या नव्या 1,109 रुग्णांमध्ये पुणे शहरातील 739 आणि पिंपरी-चिंचवडमधील 370 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button