TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या आणि समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने गेल्या निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा (सदस्य पदासह सरपंच पदाच्या) निवडणूक कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समर्पित मागासवर्ग आयोगाने ७ जुलै रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला यापुढील निवडणुकांमध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुढील निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झालेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या आणि समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने गेल्या निवडणुकांमधून वगळलेल्या जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सरपंचांची निवड जनतेतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक ५४, वेल्हे तालुक्यातील २८, इंदापुरातील २६, खेडमधील २३, आंबेगावमधील २१, जुन्नरमधील १७, बारामतीमधील १३, मुळशीतील ११, मावळातील नऊ, दौंडमधील आठ, हवेलीतील सात आणि शिरूरमधील चार अशा १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
तहसीलदारांकडून १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत भरता येणार आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज ७ डिसेंबरपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्ह ७ डिसेंबरला दिली जाणार असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २० डिसेंबरला होणार असून २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button