breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

म्हाडाच्या घरासाठी अशी करा नोंदणी

पुण्यासह सोलापूर, सांगलीत घरं, जाणून घ्या लॉटरीसंदर्भात महत्वाच्या तारखा

मुंबई | प्रतिनिधी

म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजने अंतर्गत पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी हि सोडत काढण्यात आली. या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. ही सर्व घरं अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. इच्छुकांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून –

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्हयात म्हाळूंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. तसेच सांगली येथे 129 सदनिका आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत –

पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत. 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत.

म्हाडा लॉटरीची प्रक्रिया –

– 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी अडीच वाजता नोंदणी सुरू होईल.

– 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन अर्ज सुरू.

– 11 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी पाच वाजता नोंदणीची अंतिम तारीख.

– ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2021 रोजी रात्री १२ वाजता संपेल

– ऑनलाईन देयकाची अंतिम तारीख 13 जानेवारी 2021 रोजी रात्री १२ वाजता संपेल

– आरटीजीएस / एनईएफटीसाठी शेवटची तारीख 13 जानेवारी 2021 रोजी संबंधित बँकेच्या कार्यकाळापर्यंत समाप्त होईल.

– स्वीकारलेल्या अर्जांची मसुदा यादी 18 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता प्रकाशित केली जाईल

– स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी 20 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रकाशित केली जाईल

– अंतिम विजेत्या अर्जदारांची नावे 22 जानेवारी 2021 रोजी म्हाडाच्या साईटवर प्रकाशित केली जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button