breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने प्रकाश राज झाले ट्रोल; दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले..

मुंबई : अभिनेते प्रकाश राज हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध मुद्द्यांवरून ते आपलं मत मांडत असतात. दरम्यान त्यांनी चांद्रयाम मोहिमेची खिल्ली उडवली होती. या ट्वीटनंतर ते प्रचंड ट्रोल झाले. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.

प्रकाश राज यांनी इस्त्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं व्यंगचित्र शेअर केलं होतं. ज्यामध्ये के सिवन हे चहा ओतताना दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये, चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव. असं लिहलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केलं आहे. त्यावर प्रकाश राज यांनी दुसरं ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – कांदा निर्यात शुल्कात वाढ! सामनातून केंद्र सरकारवर टीकास्त्र

प्रकाश राज यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं की, द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेष दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिलं? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा, असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button