breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“मला सल्ला हवा असेल्यास मी शरद पवार यांना फोन करतो”; एकनाथ शिंदे

शरद पवार हे देशाचे आणि राज्याचे अनुभवी नेते आहेत

पुणे : वसंतदादा शुदर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे कौतुक केले.

मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या कार्यक्रमावेळी राष्ट्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित होते.

शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतंच दावोसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणली. शरद पवार याना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार नेहमीच राज्याच्या हितासाठी आणि भल्यासाठी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज असते, तेव्हा मी त्यांना फोन करतो तेव्हा ते मला सूचना देतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचे कौतुक केलं.

शरद पवार साहेब हे देशाचे आणि राज्याचे अनुभवी नेते आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक बदल घडवले, त्यांच्यामुळे एक वेगळी उंची लाभली, जे सत्य आहे ते मी बोललो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button