breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका विषय समिती सदस्यांची आज निवड

पिंपरी – महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कार्यकाल पूर्ण होत आहे. आज (सोमवारी) होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. त्यानंतर सभापती निवड होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपद निवडणुकीत सत्ताधारी भाजपाची सरशी झाली. त्यानंतर चार विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. महिला आणि बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समिती अशा चार समिती सदस्यपदासाठी २० मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया होणार आहे.

गटनेत्यांनी पक्षाच्या तौलनिक बलाबलानुसार बंद पाकिटात नावे द्यायची असून, सर्वसाधारण सभेत महापौर राहुल जाधव ही बंद पाकिटे फोडून सदस्यांची नावे जाहीर करीत असतात. महापालिका विधी समितीवर नऊ, महिला आणि बालकल्याण समितीवर नऊ, शहर सुधारणा समितीवर नऊ, कला आणि क्रीडा समितीवर नऊ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.विधी समितीतीत एकुण नऊ सदस्य असून पाच सदस्य हे सत्ताधारी भाजपाचे तीन हे राष्ट्रवादीचे तर एक सदस्य शिवसेनेचा असणार आहे. महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समितीतीही हेच सूत्र असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button