breaking-newsराष्ट्रिय

‘त्या’ तरुणाला आडनावात ‘सिंह’ जोडणं पडलं महागात

गांधीनगर : आडनावामध्ये ‘सिंह’ जोडणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. आडनावामध्ये ‘सिंह’ जोडल्यामुळे त्याच्या मिशा कापण्यात आल्या. या सर्व घटनेचा व्हिडीओही शूट करण्यात आला. त्या तरुणाचा अपमान व्हावा यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.

गुजरातमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. २७ मे रोजी बनासकांठा जिल्ह्यात ही घटना घडली. येथील माणका गावातील रहिवासी रणजीत ठाकोर याने एका घरगुती कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर स्वतःच्या नावासमोर सिंह जोडलं. शेजारील गावामध्ये ही निमंत्रण पत्रिका पोहोचल्यानंतर क्षत्रिय समाजाच्या लोकांना रणजीतचा राग आला. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने रणजीतला पकडलं आणि त्याच्या मिशा कापल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button