TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘गलिच्छ’ राजकारणाच्या निषेधार्थ पिंपरीत मनसेकडून ‘एक सही संतापा’ची मोहीम

पिंपरी :
राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप करत लोकांच्या मनातील संताप व भावना व्यक्त व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ‘एक सही संतापा’ची मोहीम हाती घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात पिंपरी चौकात आज (दि.०८) करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने सही करत संताप व्यक्त करत आहेत.

पिंपरीत या ‘एक सही संतापा’ची मोहीमची सुरुवात शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. या कार्यक्रमासाठी गणेश आप्पा सातपुते, किशोरजी शिंदे, रंजीत दादा शिरोळे, रुपेश पटेकर, चंद्रकांत बाळदानवले, विशाल मानकरी, राजू सावळे, दत्ता देवतातसे, अंकुश तापकीर, हेमंत डांगे, अनिकेत प्रभू, राजू भालेराव, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, वैशाली बोत्रे, पुनम भोकरे, श्रद्धा देशमुख, विष्णू चावरिया, सचिन मिरपगार, परमेश्वर चिलरगे, नाथा शिंदे, नितीन चव्हाण, भागवत नागपूर, ओलेक्स मोजेस, कैलास दुर्गे, जयसिंग भाट, काशिनाथ खजूरकर, देवेंद्र निकम, प्रतीक शिंदे, नारायण पठारे, सुरेश सकट मोठ्या मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरीतील फलकावर काही तासात नागरिकांनी सह्या करत सध्या सुरू असलेल्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. एकदा मतदान केले की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का, राजकारणाचा चिखल झाला आहे का, माझ्या मताला काही किंमत नाही का, या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का, चिड येत नाही का, संताप येत नाही का, जर येत असेल तर ..! एक संतापाची सही करा असा मजकूर फलकावर आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी होत आहेत. राज्यातील राजकारणाची नैतिकता संपली आहे. सत्ता प्राप्तीसाठी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले जात आहे. सत्तेसाठी अनैतिक आघाडी, युती केली जात आहे. त्यामुळे मतदाराचा अपमान होत असल्याने या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती पाहता, राज्यात जे गलिच्छ राजकारण चालू आहे, हे सर्व पाहता त्याचाच एक भाग लोकांच्या मनातील संताप व भावना व्यक्त व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button