breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पाच वर्षांत गड-किल्ल्यांवर अडकलेल्या ९०० गिर्यारोहकांची झाली सुखरूप सुटका

पुणे |

महाराष्ट्राच्या विविध भागातील गड-किल्ल्यांवर अडकलेले गिर्यारोहक, पर्यटक, साहसप्रेमी अशा एकूण ९०० पेक्षा अधिक जणांना मागील पाच वर्षात महाराष्ट्र गिर्यारोहण आपत्ती निवारण समन्वय केंद्राच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती या केंद्राचे संचालक राहुल मेश्राम यांनी दिली.महाराष्ट्राच्या पर्वतरांगांमधील गड, किल्ले, आव्हानात्मक सुळके हे पाषाण चढणारे साहसवीर, निसर्गप्रेमी, छायाचित्रकार यांच्यासाठी क्रीडांगणे झाली आहेत. गिर्यारोहण, साहस करण्याची आवड त्यामुळे अनेक जण आपला छंद जोपासण्यासाठी, काही जण शरीर सुदृढतेचा भाग म्हणून गिर्यारोहणकडे बघतात. काही निसर्ग, पर्यावरणाची आवड म्हणून गड-किल्ल्यांची भ्रमंती करतात, असे संचालक मेश्राम यांनी सांगितले.

गिर्यारोहण, साहस करून सुळक्यावर चढणे, गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अनेक जण सहली काढतात. गड किल्ल्यांवरील चढ उताराच्या जागा, पायवाटा माहिती नसल्याने, सोबत मार्गदर्शक नसल्याने अनेक पर्यटक जंगलात रस्ता चुकतात. काही सुळक्यावरून उतरताना पायथा आणि सुळका यांच्या मधल्या डोंगर कपारीत अडकतात, असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून नियमित घडत आहेत. अशा गिर्यारोहक, पर्यटकांची सुटका करण्यासाठी एखादी संस्था असावी, प्रशिक्षित स्वयंसेवक असावेत या उद्देशातून महाराष्ट्र माउंटेनीअयर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या गड, किल्ल्यांच्या परिसरातील गावांमधील तरुण ग्रामस्थ, आदिवासी पाड्यांवरील तरुण मुलांना बचाव कार्याचे अद्ययावत प्रशिक्षण देऊन स्वयंसेवक तयार करण्यात आले आहेत.

पुणे, नाशिक, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, महाबळेश्वर , डोंबिवली, सातारा भागातील गिरिभ्रमण, गिर्यारोहण आणि निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांना डोंगर दरयामध्ये अडकलेल्या पर्यटक, साहसवीरांना कशी मदत करायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बचाव, मदत, पुनर्वसन कार्याची माहिती असावी यासाठी वन विभागाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्र गिर्यारोहण आपत्ती निवारण केंद्राचा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो. स्थानिक पातळीवर बचावकार्यासाठी यंत्रणा असावी या उद्देशातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून यंत्रणा उभ्या केल्या आहेत, असे संचालक मेश्राम यांनी सांगितले.

संपर्क क्रमांक -७६२०२३०२३१, संस्थेच्या बचाव पथकातील स्वयंसेवक- ३५०, पाच वर्षात सुटका केलेले पर्यटक, साहसवीरांची संख्या – ९००, गेल्या वर्षभरात बचावासाठी गड-किल्ल्यांवरून २८० संपर्क, संस्था संलग्न स्थानिक बचाव संघटना – ३०, सर्वाधिक बचाव मोहिमा २०२० मध्ये – ३००, आठवडाभर २४ तास मदत उपलब्ध.

संवेदनशील ठिकाणे –

हरिचंद्र गड, लोणावळा, खंडाळा, लोहगड, तिकोना, ढाक बहिरी किल्ला, देवकुंड धबधबा, तम्हिनी घाट मानगड, चंदेरी, सिंहगड, तोरणा, विसापूर किल्ला.

सहलीसाठी जाताना नेहमी मार्गदर्शक आणि आवश्यक माहिती सोबत ठेवावी –

गिर्यारोहण, डोंगर प्रदेशात जलद बचावकार्य उपलब्ध व्हावे या उद्देशातून महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर एक यंत्रणा असावी या उद्देशातून संस्था काम करते २४ तास संस्थेचे कार्यकर्ते बचावासाठी उपलब्ध असतात. गड-किल्ल्यांवर गिर्यारोहण, सहलीसाठी जाताना नेहमी मार्गदर्शक आणि आवश्यक माहिती सोबत ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र गिर्यारोहण आपत्ती निवारण समन्वय केंद्र संचालक राहुल मेश्राम यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button