breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, नारायण राणेंचं स्फोटक ट्विट

मुंबई | प्रतिनिधी  
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्फोटक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे शिवसेनेला  गंभीर इशारा दिला आहे. मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना लवकरच खास बातमी मिळेल, असा इशारा नारायण राणे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

सुशांत सिंह आणि दिशा सालियान प्रकरणी चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अभिनेत्री दिशा सालियन यांचाही उल्लेख केला आहे. या दोघांनी आत्महच्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे”, असा गंभीर आरोपही राणेंनी या ट्विटमधून केला आहे. या दोघांच्या मृत्यची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button