ताज्या घडामोडीपुणे

कौतुकास्पद ! भटकलेल्या मानसिक रुग्णाला पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले

पुणे | कोल्हापूर वरून पुण्यात आलेल्या आणि भरकटलेल्या एका मानसिक रुग्णाला डेक्कन पोलिसांनी सुखरूप त्याच्या कुटुंबाकडे पोहोचवले आहे. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.अनिकेत नितीन खापरे (वय 28, रा. इवॉर्ड शाहूमिल चौक, कोल्हापूर) असे या तरुणीचे नाव आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात याची नोंद केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिट मार्शल पठाण आणि कांबळे गस्त घालत होते. यावेळी त्यांना बीएमसीसी महाविद्यालय रस्त्यावर एक तरुण संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. या पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने घरात भांडण झाल्यामुळे कोल्हापूरहून पुण्यात आलो असल्याचे सांगितले. तर प्रवासात असतानाच मोबाईल गहाळ झाला त्यामुळे घरच्यांचे नंबर माहित नाहीत असे देखील या तरुणाने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर डेक्कन पोलिसांनी याचा शोध घेण्याचे ठरवले. कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या विषयी अधिक माहिती घेतली आणि पोलिसांचा त्या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. या तरुणाच्या नातेवाईकांनी आम्ही तात्काळ त्याला घेण्यासाठी पुण्याला येत असल्याचे सांगितले.

त्यानंतर सकाळी त्याचे वडील व काका पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मुलगा असल्याची ओळख पटवून दिली. तो यापूर्वी देखील घर सोडून गेला होता. तो मानसिक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन कुटुंब परत गेले. यावेळी त्यांनी डेक्कन पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button