पिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून डंपर चालकाला बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

डंपर समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराचा त्याच्या दुचाकीवरील तोल गेला आणि दुचाकी घसरली. त्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या पाच साथीदारांनी डंपर चालकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजता नवलाख उंबरे फाटा चौक मंगरूळ गावच्या हद्दीत घडली.

तुषार तांबोळी (रा. मंगरूळ), मंगेश तांबोळी (आंबळे), अमोल तांबोळी (रा. मंगरूळ), माणिक तांबोळी, सखाराम तांबोळी, कुणाल तांबोळी (सर्व रा. आंबळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज अशोककुमार नागरगोजे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा डंपर चालवत जात होते. त्यावेळी नवलाख उंबरे बाजूकडून फिर्यादी यांच्या डंपर समोर आरोपी माणिक तांबोळी हा दुचाकीवरून आला. अचानक डंपर दिसल्याने त्याचा दुचाकीवरील तोल गेला आणि त्याची दुचाकी घसरली. त्यांनतर आरोपी माणिक हा फिर्यादी यांच्या डंपरजवळ आला आणि त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी तुषार, मंगेश आणि अमोल आले त्यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जवळच आरोपी माणिक तांबोळी याचा गोठा आहे. तिथे नेऊन फिर्यादी यांना बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी सखराम आणि कुणाल यांनी लाथाबुक्क्यांनी फिर्यादी यांना मारले. शिवीगाळ करून ‘पुन्हा मंगरूळ परिसरात दिसल्यास हात पाय काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button