breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाचे ३५० रूग्ण पॉझिटिव्ह

पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज (दि.०४) नवीन कोरोना रुग्णांची संख्या ३५० इतकी झाली आहे. दरम्यान आज ओमिक्राॅनचा १ रूग्ण आढळून आला आहे. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील ४ हजार ५२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील २ लाख ७९ हजार ९२२ जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.

सध्या ८०५ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील ५७२ रुग्ण गृहविलगीकरणात असून २३३ सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात १२ हजार १४८ नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत ३० लाख १ हजार ४४७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button