TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अमेरिकेवरून कुरिअरद्वारे अंमलीपदार्थांची तस्करी 

अमेरिकेतून कुरिअरद्वारे अंमलीपदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) दोघांना अटक केली. याप्रकरणी अंधेरी पूर्व सहार आयसीटी टर्मिनल येथून ८६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहफेलिक्स मचाडो व हेमंत बंगेरा अशी अटक आरोपीचे नाव आहे. यातील मचाडो हा डोंबिवली येथील रहिवासी आहे, तर बंगेरा हा अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहे. टर्मिनलवर दोन संशयीत लाकडी खोक्यांमध्ये गांजा असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी डीआरआयने कुरिअर कक्षात शोध मोहिम राबवली.

याप्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. पण या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग येत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरिअर सेवेचा वापर होतो. त्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध राहात नाही. परिणामी आरोपींपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.

तरीही याप्रकरणी दोघांना अटक करण्यात यश आले आहे. या संपूर्ण कारवाईत ८६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन लाकडी खोक्यांच्या आत अॅल्युमिनियमच्या आवरणात गांजा लपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी सीमाशुल्क दलाल आहेत, वस्तूंची ने-आण व इतर गोष्टींसाठी त्यांना प्रत्येकवेळी पाच ते १० हजार रुपये मिळत होते, असा संशय आहे. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करत आहे. डीआरआयने या आठवड्यात दोन हजार रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button