breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

लखनऊ – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. उत्तर प्रदेशातही सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. सरकार तर्फे नियमांचं कडेकोट पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता नवा निर्णय घेतला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार उत्तरप्रदेशात कोरोनाचा रुग्ण ज्या ठिकाणी आढळेल त्या परिसरातील आजूबाजूची 20 घरं सील केली जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या उत्तर प्रदेशात वाढतच जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

वाचा :-AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला

उत्तर प्रदेशात इमारतींसाठी ही वेगळे नियम तयार केले गेले आहेत त्यामध्ये जर एखाद्या मजल्यावर कोरोनारुग्ण आढळून आला तर संबंधित मजला सील करण्यात येणार आहे तसेच एका ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास त्या सबंध इमारतीला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येऊन 14 दिवसांसाठी तिथे निर्बंध लावुन कोणालाही घराबाहेर जाता येणार नाही. तसेच परिसरात एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास जवळपासचे सील करून त्यांना कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात सध्या 19 हजार 738 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी रुग्ण संख्येबाबत रविवारी ही माहिती दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशात आतापर्यंत 3 कोटी 54 लाख 13 हजार 966 कोरोना चाचण्या झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button