Uncategorized

सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी 

परतीच्या पावसाने धुमाकूळ  घातला असून सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पुण्याच्या तुलनेत पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते.  पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री 31 मिली मीटर पावसाची नोंद झाली.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. बघता बघता सगळीकडे पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला. तर, खोलगट भागात पाणी साचले. काही ठिकाणी निचरा होऊ शकला नसल्याने रस्त्यावरही पाणी साचले. कासारवाडीतील शंकरवाडी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण तुलनेत कमी होते.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये काही ठिकाणी पाणी साचले. त्याचे प्रमाण कमी होते. खोलगट भागात पाणी साचले होते. सकाळपर्यंत त्या पाण्याचा निचरा झाला. पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते. जिथे पाणी साचले तिथे बॅरिकेट्स लावले होते. रहाटनीत झाड पडण्याची घटना घडली. त्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. यंत्रणा रात्रभर सतर्क होती. आपल्या यंत्रणेला मदतीसाठी पुण्यात जावे लागले”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button