breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल, दोन आरोपींना जन्मठेप, तिघे निर्दोष

पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनी निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोप होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आरोपी क्र. १ वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष सोडले आहे. आरोपी संजीव पुनाळेकर यांनी मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. विक्रम भावे यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी क्र. २ आणि ३ अनुक्रमे शरद कळसकर आणि सचिन अंदूरे यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणखी वाढणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

हेही वाचा     –       ‘बाळासाहेब, माँसाहेबांना नकली म्हणता, तुम्हीच औरंगजेबाची संतान’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

कधी आणि कशी झालेली हत्या?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button