ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. दिलीप गरुड यांना बालकमित्र पुरस्कार

पिंपरी चिंचवड | सांगवी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांना बालक संस्थेच्या वतीने, बालकमित्र हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.डॉ. गरुड यांनी सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून, गेली तीन दशके महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी कथाकथन केले आहे. शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी ते मार्गदर्शन करत असतात.

त्यांची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित असून, ते अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कोषाध्यक्ष व शिक्षण संक्रमण मासिकाचे संपादन मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सदर पुरस्कार डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते 4 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button