breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

नगरसेवक संदीप पवार खूनप्रकरणातील दोन फरार आरोपींना अटकेत

  • म्हैसूर येथून मोठय़ा शिताफीने अटक, पंढरपूर पोलिसांची कामगिरी

पंढरपूर |

येथील नगरसेवक संदीप पवार खूनप्रकरणातील दोन फरार संशयिताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मोठय़ा शिताफीने अटक केली. मोक्कातील फरार सुनील विठ्ठल वाघ आणि त्याचा साथीदार सचिन भगवान देवमारे हे दोघे कर्नाटकातील म्हैसूर येथे वेषांतर करून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आणि या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. यातील सुनील वाघ याला नऊ दिवसाची तर सचिन देवमारे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. येथील नगरसेवक संदीप पवार यांचा गुढी पाडाव्या दिवशी म्हणजेच  १८ मार्च २०१८ रोजी भरदिवस हमरस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बंदूक आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात गोपाळ अंकुशराव याच्यासह २४ जणांना अटक करून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली.

मात्र या प्रकरणातील सुनील वाघ, सचिन देवमारे व अन्य एक असे तिघेजण फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मात्र हे तिघे पोलिसांच्या हाती लागले नाही. याच दरम्यान, सुनील वाघ हा कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव व वेषांतर करून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी मागोवा घेत वाघ व देवामारे यांना मोठय़ा शिताफीने ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनील वाघ याला ९ दिवसांची तर सचिन देवमारे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. या प्रकरणातील एकाचा शोध पोलीस घेत आहेत. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, सुनील बनसोडे, विनोद पाटील, सुजित जाधव, अन्वर आतार आदींनी पार पाडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button