ताज्या घडामोडीमुंबई

मुलांना जातीपातीचं राजकारण शिकवू नका; प्रकाश आंबेडकरांवर मनसे नेत्याचा प्रहार

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. राज यांच्या या भूमिकेवर सुजात आंबेडकर यांनी जोरदार निशाण साधत आधी तुमच्या मुलाला रस्त्यावर उतरायला सांगा, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता दंगली घडवण्यात उच्चवर्गीय ब्राह्मणच पुढे असतात, असं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य केलं आहे.

‘प्रकाश आंबेडकर यांनी कृपा करून अशा प्रकारचे संस्कार मुलावर करू नयेत. मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे जाईल, पण जातीपातीचं राजकारण या मुलांना तरी शिकवू नका,’ असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला आहे.

दुसरीकडे, राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. मशिदीबाबतच्या भूमिकेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर राज ठाकरे आपल्या सभेतून जोरदार प्रहार करण्याची शक्यता आहे. तसे संकेतही मनसे नेत्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज राज यांची तोफ नक्की कोणाविरोधात धडाडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

मनसेबद्दल नक्की काय म्हणाले होते सुजात आंबेडकर?

सुजात आंबेडकर यांनी औरंगाबादमधील एका महाविद्यालयात बोलताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेतला. ‘बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो की अन्य कोणतीही दंगल बघितली की लक्षात येतं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रभावित होऊन दंगलीत जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहुजन मुलं असतात. राज ठाकरेंना माझं एवढंच म्हणणं आहे की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं,’ असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button